रोटवद नाल्याच्या प्रवाहात पलटी झालेल्या रीक्षातील मुलाचा मृतदेह सार्वे जवळ सापडला .(व्हीडीओ न्युज)

0
982

रोटवद ता .जामनेर ,दि .१० ( एकनाथ शिंदे ) : – जळगांव कडुन लोहारा मार्गाने शेंदूर्णी कडे जात असलेल्या मालवाहु रीक्षामधे चालक सीटवर फक्त स्टेअरींग धरायला बसलेल्या दिनेश गुजर या १३ वर्षाच्या बालकाचा नाल्याला अचानक आलेल्या पुरामधे वाहुन दुर्देवी अंत झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

या बाबत सविस्तर असे की , शेंदूर्णी येथील रहीवाशी दिनेश गुजर हा मुलगा नातलगाकडे शिक्षणासाठी जळगांव येथे वास्तव्यास होता . त्याच्या काकांची मालवाहु रीक्षा जळगांव वरून शेंदूर्णी जात असल्याने तो या रीक्षामधे घरी जाण्यासाठी अन्य प्रवाशां सोबत बसला होता. काल दि .९ रोजी रात्री ९ वा . ही रीक्षा लोहारा मार्गाने जात असतांना रोटवद गावा जवळील नाल्याला पाणी आलेले होते, अन्य वाहने कडेला थांबलेली असतांना रीक्षाचालकाने या नाल्याच्या फरशी वरून रीक्षा काढण्याचा प्रयत्न केला परंतु रीक्षा मधेच बंद पडल्याने अडकली . त्यामुळे रीक्षामधे बसलेला दिनेश हा लहान असल्याने त्याने ड्रायव्हर स्टेअरींग सांभाळावी अन्य प्रवाशी रीक्षाला धक्का मारून रीक्षा पुढे लोटतील असा निर्णय या सर्वांनी या क्षणी घेतला त्यानुसार मयत दिनेश हा रीक्षाच्या स्टेअरींगवर बसला परंतु याच वेळी नाल्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने रीक्षा पलटी झाली . अन्य प्रवाशी जीव वाचविण्यासाठी पळुन गेले . दुर्देवी दिनेश मात्र मधे अडकल्याने तो पाण्याच्या प्रवाहा सोबत वाहुन गेला . त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न यावेळी सुरू असलेल्या पावसामुळे आणि रात्रीच्या अंधारामुळे पूर्ण झाला नाही . अखेर आज दि .१० रोजी सकाळी घटना स्थळापासुन दोन किलोमीटर वर असलेल्या सार्वे गावाजवळील नाल्यामधे दुर्देवी दिनेशचा मृतदेह हाती लागला आहे . बापु गुजर यांना मृत दिनेश हा एकुलता मुलगा होता . त्याच्या दुर्देवी मृत्यु बद्दल शेंदूर्णी गावामधे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .