GM NEWS , अभिनंदनिय वृत्त : महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोसिएशनची नुतन राज्य कार्यकारणी घोषीत. अध्यक्षपदी जामनेर येथील सुनील ( बंडू ) रामदास पाटील यांची निवड . विविध स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव .

0
237

जामनेर , दि .२७( विनोद बुळे ) :- जामनेर येथील खेळाडू सुनील ( बंडूभाऊ ) रामदास पाटील यांची महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे .
सुनील पाटील यांच्या शूटिंग बॉल खेळातील योगदानाची पावती म्हणूनच त्यांची निवड झाली आहे . शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यालयात राज्य शुटींग बॉल संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी निवडणुक पार पडली . या प्रसंगी संघटनेचे कोषाध्यक्ष ठाकरे सर यांची उपस्थीती होती . या नविन कार्यकारीत राज्य सचिव पदी काशिनाथ रामचंद्र ठाकरे (जळगांव ), राज्यउपाध्यक्ष पदी मुकेश रामचंद्र चित्ते ( जालना ), पंडीत अंनत पाटील ( ठाणे ), अशोक माधवराव चौधरी (जळगांव ), तर सहसचिव पदावर अंकुश प्रल्हाद राठोड ( औरंगाबाद ), कोषाध्यक्ष पदी वसंत आनंदा शेजवळ (पुणे ), राज्य कार्यकारणी सदस्य पदी फैजअहमद नबीलाल बेगमपुरे (सोलापुर ), आनंदकुमार विमलकुमार प्रभुदेसाई ( सिंधुदुर्ग ) या नविन राज्य कार्यकारीची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे . या निवडणुक प्रक्रीयेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अॅड . सुरज जहांगीर चौधरी, निरीक्षक म्हणून मनोज सुळे यांनी काम पाहिले .सर्व नवनियुक्त राज्य कार्यकारणीसह नवनियुक्त अध्यक्ष सुनिल उर्फ बंडुभाऊ पाटील यांच्या निवडीबद्दल अभय बोहरा , पिंटू कोठारी, विनोद बुळे ,धर्मेंद्र अशोक राका , राजू शर्मायांच्यासह मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे .
जीएम न्यूज परिवाराच्यावतीने सुद्धा त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !