जळगांव जिल्हा रुग्णालयात १५ सप्टेंबर रोजी मोफत अपस्मार (फीट) रोग निदान-उपचार शिबीर . -जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ .एन.एफ . चव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहीती .

0
243

जळगाव दि.११ ( एकनाथ शिंदे):-
जिल्हा रुग्णालय जळगाव व इपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, अपस्मार रोगाचे निदान व उपचार मोफत शिबिर 15 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात सकाळी 9 वाजेपासून या शिबिराची सुरुवात होणार असून, गरजू अपस्मार रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन, जिल्हा रुग्णालय व इपिलेप्सी फाउंडेशनच्या वतीने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एन. एफ. चव्हाणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.