GM NEWS, FLASH : जामनेर तालुक्यातील पाळधी येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी .

0
362

पाळधी , ता जामनेर दि . २ ( योगेश कोळी ) : –

जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सर्वप्रथम सोसायटीचे संचालक पंढरी पाटील व आबा पाटील यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकत दोन्ही महापुरुषांच्या देशाच्या विकासासाठी, शेतकरी, मजूर व स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कशाप्रकारे आपले जीवन वाहून दिले या विषयी मनोगत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला चेअरमन कैलास पाटील, व्हा चेअरमन योगेश सुशिर्, गणेश पाटील, भानुदास पाटील, कैलास शेवाळे, सुनील पाटील, धनराज दांडगे, नामदेव पाटील, संदीप पाटील तसेच संस्थेचे सचिव, कर्मचारी प्रशांत पाटील उपस्थित होते.