GM NEWS , गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील सांगवी येथील 25 वर्षीय तरूण बेपत्ता . नातेवाईकांकडे शोध घेऊनही तपास लागेना . पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल .

0
219

पहूर , ता . जामनेर , दि . ५ ( शंकर भामेरे ) :-जामनेर तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी २५वर्षीय तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता झाला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की ,सांगवी येथील रहिवासी योगेश ज्ञानेश्वर चौथे ( वय 2 5 ) हा तरुण घरी काहीही न सांगता 2 ऑक्टोबर रोजी घरातून निघून गेला आहे .पालकांनी आजूबाजूला नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो अद्याप पावेतो मिळून आला नाही . अखेर आज सोमवारी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार तरुणाचे वडील ज्ञानेश्वर केशव चौथे यांनी दाखल केली आहे . या तरुणा विषयी काही माहिती असल्यास पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .