फोटोग्राफर्स बांधवांना मिळणार ज्ञानाची मेजवाणी ! JP गृप च्या वतीने पराग शिंदे यांच्या कार्यशाळेचे जामनेरात (उदया)15 सप्टें रोजी आयोजन .

0
339

जामनेर दि .14 ( मिलींद लोखंडे ) : – एका छायाचित्रामधे हजारो शब्द व्यक्त करण्याचे सामर्थ्य असते . अशा प्रतिभावंत फोटोग्राफर्स बांधवांसाठी विख्यात छायाचित्रकार पराग शिंदे ( मुंबई ) यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन JP गृप च्या वतीने उदया १५ सप्टें रोजी जामनेर शहरात करण्यात आले आहे .जामनेर शहरातील बोहरा मंगल कार्यालय या ठीकाणी सकाळी ९ वा . पासुन कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे .
फोटोग्राफर्स बांधवांना मार्गर्शक म्हणुन लाभलेले विख्यात छायाचित्रकार पराग शिंदे ( मुंबई ) यांना व्यावसायीक फोटोग्राफी क्षेत्रातील ३३ वर्षाचा दांडगा अनुभव असुन ते गेली १८ वर्ष ‘सन्मानाने कमवा ‘ ही संकल्पना घेऊन फोटोग्राफर्स बांधवांना मार्गदर्शन करत आहेत . या एकदिवशीय कार्यशाळेमधे छायाचित्रणातील बारीक कांगोरे फोटोग्राफर्स बांधवांना प्रात्यक्षिकासह शिकता येणार असुन पराग शिंदे यांच्या जवळ वैयक्तीक संवाद सुद्धा साधता येणार आहे .
कार्यशाळेमधे मर्यादित सशुल्क प्रवेश असुन जास्तीत जास्त फोटोग्राफर्स बांधवांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक JP गृप जामनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे .