GM NEWS , FLASH : पहूरपेठ ग्रामपंचायत मार्फत कन्या शाळा संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची उपसरपंचासह ग्रा.पं . सदस्यांची तक्रार , सीईओ तसेच बिडीओ यांच्या कडे निवेदनाद्वारे केली चौकशीची मागणी .

0
345

पहूर ,ता. जामनेर दि. ८- ( शंकर भामेरे ) पहूरपेठ गृप ग्रामपंचायत अंतर्गत सांगवी ,खर्चाणे ,उर्दूशाळा खाजानगर , शिवनगर ,पहूर पेठ कन्या या जि .प .शाळांच्या संरक्षण भिंती ४५ लाख रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्या निधीच्या माध्यमातून या जिल्हा परिषद शाळांच्या संरक्षण भिंतींची कामे प्रगती पथावर आहेत. मात्र पहूरपेठ जि प कन्याशाळेचे संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप उपसरपंचासह विरोधी ग्राम पंचायत सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे.इतर शाळांच्या संरक्षण भिंतींचे काम विटकामात करण्यात येत आहे. मात्र या शाळेचे संरक्षण भिंतीचे बांधकाम इस्टीमेटनूसार विटकामात करणे अपेक्षित असतांना ते सिमेंटच्या ब्लाॕकमध्ये होत असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. बांधकाम लाईन ओळंब्यात नसून निकृष्ट काम केले जातआहे. यामुळे संभाव्य संकट म्हणून शाळेतील विद्यार्थीनींच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सदर बांधकाम बंद करण्यात येऊन ग्रामपंचायतीने चौकशी करावी. सदर बांधकाम इस्टीमेटनूसार नसल्याने या कामाची एम बी न करता ठेकेदारास कामाचे पेमेंट अदा करू नये.काम स्थगीत करण्यात येऊन उत्कृष्ट प्रतीचे बांधकाम करण्यात यावे . अशा तक्रारीचे लेखी निवेदन उपसरपंच शामराव सावळे ,माजी सरपंच प्रदीप लोढा , माजी उप सरपंच रवी मोरे ,ग्रा प सदस्य शरद भागवत पांढरे ,शांताराम पांडुरंग पाटील ,छायाबाई ईश्वर बारी ,सुफीयाबी शे जैनूद्दीन ,तब्बसूमबी शे. फारूक ,बेबीबाई चांदखाॕ तडवी या ग्रामपंचायतच्या विरोधी सदस्यांनी पहूरपेठ ग्रामपंचायतीसह ,गटविकास अधिकारी जामनेर ,मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांचेकडे केली आहे.

” पहूरपेठ ग्रामपंचायत अंतर्गत इतर जि .प .शाळांच्या संरक्षण भिंतींचे काम वीट कामात करण्यात येत आहे. मात्र जि प कन्याशाळेच्या संरक्षण भिंतीचे काम इस्टीमेटनूसार न करता राखेच्या वाळूमिश्रीत ब्लाॕकमध्ये केले जात आहे.दिड मिटर फुटींगा न घेता ४ फुटावरच घेण्यात आल्या आहेत .अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने याची चौकशी व्हावी. अशी तक्रार गट विकास अधिकारी , मुख्य कार्याकारी अधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.

प्रदीप मोहनलाल लोढा माजी जि .प .कृषी सभापती तथा माजी सरपंच पहूरपेठ