GM NEWS,गुन्हे वार्ता : शेतकऱ्याच्या शेतातील पाणबुडी (इले.पंप ) चोरीचा गुन्हा दाखल करण्यास एक महिन्या पासुन दिरंगाई . अखेर फत्तेपुर पोलीस प्रशासना विरुद्ध मागासवर्गीय शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली तक्रार .

0
478

फत्तेपूर ता.जामनेर दि.८ (प्रतिनिधी ) : –

येथून जवळच असलेल्या टाकळी-पिंप्री येथील मागासवर्गीय शेतकऱ्याने फत्तेपूर पोलीसांकडे शेतातील पाणबुडी( इले.पंप) चोरी बाबतची तक्रार एका महिन्याअगोदर दिली होती.तक्रारी
बाबत पोलीसांनी अद्याप पर्यंत साधी चौकशी किंवा चोरीचा गुन्हा दाखल केलेला नाही.म्हणून कंटाळून या शेतकऱ्याने येथील पोलीसाची तक्रार पोलीस
अधिक्षकाकडे करून येथील पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बदल्या कराव्या.व या ठिकाणी सुरु असणाऱ्या प्रकाराची सखोल चौकशी करावी.योग्य ती कारवाई जर झाली नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असा इशारा त्यांनी
तक्रारी अर्जात दिलेला आहे.
पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत फत्तेपूर पोलीस दूरक्षेत्राचा कारभार चालतो.याच दूरक्षेत्रामध्ये टाकळी-पिंप्री हे गांव येते. याच गांवातील मागासवर्गीय शेतकरी सुनिल विश्वनाथ शेजुळे यांची शेत जमीन गट नं.५५
ही मेहेगांव शिवारात आहे.याच शेतीमध्ये त्यांनी विहीर खोदून इले.पंप,पाणबुडी बसवून
पूर्णशेतीतील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यातच अचानक त्यांच्या विहीरीत असणारी पाणबुडी इले.पंप दि.३०ऑगस्ट रोजी चोरटयानी पाईप कापून चोरी केला. अगोदरच
दुष्काळी परिस्थिती त्यात हे मोठे संकट आले. म्हणून सुनिल शेजुळे पार खचून गेले.आता पिकांना पाणी कसे देता येईल इले.पंपासाठी पैसे कोठून आणावे? पिकांचे नुकसान कसे वाचविता येईल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले.
आपल्या चोरी झालेल्या इले. पंपाचा तपास पोलीस लावतील व इले.पंप मिळेल.या उद्देशाने
त्यांनी त्वरीत पोलीसाकडे झालेला प्रकार सांगून तसा तक्रारी अर्ज दिला.आठ दिवस उलटले तरीही आपल्या अर्जाची दखल पोलीस घेत नाही. पोलीसाकडे चकरा मारून कुठे पोलीस शेतात आले. मात्र त्यांनी पंचनामा केलाच नाही.फक्त पाहणी करून निघून गेले.त्यानंतर १५ दिवसाचा कालावधी गेला तरी ही पोलीस चोरीचा गुन्हा किंवा तपास करीत नाही.म्हणून कंटाळून मी ही बाब पत्रकार बांधवांना सांगून इले.पंप चोरी बाबतच्या बातम्या लावल्या तरीही पोलीस कुठलाच पवित्रा घायला तयार नाही.मी गरीब व मागासवर्गीय शेतकरी असल्याने माझ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजताच मी ही बाब वरीष्ठां च्या लक्षात आणणेसाठी तक्रारी अर्ज करीत आहे.
माझ्या इले.पंप चोरीच्या अगोदर अनेक शेतकऱ्याचे इले.पंप चोरी झाले आहेत.ही बाब
मला त्याच शेतकऱ्यानी सांगितली. त्यांच्या कडून सुद्धा पोलीसांनी तक्रार अर्ज घेतलेले आहेत. चोरीचा गुन्हा मात्र दाखल केला नाही.आजपर्यत चोरीची तक्रार किंवा इतर तक्रारी
घेवून येणाऱ्या अर्जदारास ओसी(पोच) दिली जात नाही. अनेक शेतकऱ्यानी इले.पंप चोरीचे अर्ज दिले आहेत.मात्र चोरीचा तपास शुन्य आहे म्हणून अनेकांनी पोलीसांकडे अर्ज देणे च बेद केले आहे.त्याच प्रमाणे जळांद्री गांवातील व्यायाम शाळा साहीत्य लाखो रुपयांची चोरी
झाली.तपास किंवा चोरीचा गुन्हा दाखल नाही. येथील पोलीसांकडे तक्रार घेवून येणाऱ्या कडून
अर्ज घेतला जातो?या मागे कोणते गुपीत आहे.फिर्यादीची फिर्याद न घेता अर्ज घेतला जातो. त्यावर पोच मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
या ठिकाणी असणारे पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून येथेच कार्यरत आहेत त्यामुळे कोणाला कशी सेवा दयायची हे त्यांना चांगले माहीत झालेले आहे. या खेळामध्ये मात्र गोर गरीबाला न्याय मिळेल हे सांगता येत नाही? तरी वरीष्ठांनी येथील प्रकार लक्षात घेता सखोल
चौकशी करून शेतकऱ्याच्या इले. पप चोरीचा तपास लावावा. व दिरंगाई करणाऱ्या वर योग्य
ती कारवाई करून त्यांची बदली करावी. व या ठिकाणी सक्षम पोलीस पाठवावे. जेणे करून
सर्वाना न्याय मिळेल? अशी तक्रार मागास वर्गीय शेतकरी सुनिल शेजुळे यांनी पोलीस अधीक्षक जळगांव यांचे कडे केलेली आहे . वेळ पडल्यास आंदोलनात्मक पवित्रा घावा लागला तर घेतला जाईल असा इशारा ही या निवेदनात दिलेला आहे.तसेच या निवेदनाच्या
प्रती,जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी जळगांव, त्याच प्रमाणे सर्व दैनिकांच्या पत्रकाराना प्रसिद्धीसाठी दिल्या आहेत.