GM NEWS , गुन्हे वार्ता . जामनेर येथील तरुणीस ब्लॅकमेल करून २५ हजार रुपयांमध्ये गंडविणाऱ्या तरुणाच्या जामनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या . ‘इन्स्टाग्राम’ सोशल साईटवर गोड बोलुन केली तरुणीशी मैत्री . फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन करत होता ब्लॅकमेल . ८ महिन्यात २५ हजार रुपयांना गंडवले. अजुनही करत होता १३ हजार रूपयांची मागणी .

0
1468

जामनेर , दि.१०( मिलींद लोखंडे) : – जामनेर येथील एका २० वर्षीय तरुणीशी ‘ इंस्टाग्राम ‘या सोशल मीडिया साईटवर गोड बोलुन मैत्री केल्या नंतर तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलींग करून तीच्या कडून २५ हजार रूपये उकळल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली . या प्रकरणी जळगांव शहरात वास्तव्यास असणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुला विरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास अटक करण्यात अली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की , जामनेर येथील २० वर्षीय तरुणीस जळगांव येथील शुभम बोरसे या तरुणाने ८ महिन्यांपूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली .सदर फ्रेन्ड रिक्वेस्ट जामनेरच्या तरुणीने स्वीकारल्याने दोघांमध्येओळख निर्माण झाली .पुढे ओळखीचे रूपांतर आभासी मैत्रीच्या नात्यात झाले .

अन् त्याने मागीतले ‘फोटो ‘ … इन्स्टाग्राम ॲपच्या माध्यमातून शुभमने ‘ त्या ‘ तरुणीशी चॅटींग सुरु केली . त्याने त्या तरुणीचे फोटो डाऊनलोड केले . त्यानंतर चॅटींगद्वारेे गोड गोड बोलून वैयक्तिक फोटो मागितले . ‘ त्या ‘ तरुणीने सुद्धा भाबड्या मनाने तीचे वैयक्तिक फोटोही पाठविले . अशा प्रकारे दोन्ही मध्ये चोगली मैत्री झाल्या नंतर मित्र म्हणुन अधून-मधून चॅटींग होत राहीली .

३०० ० रुपयांची केली मागणी –

मार्च २०२० मध्ये शुभमने त्या तरुणीस फोनवर ३००० रुपयांची मागणी केली . सदर रक्कम न दिल्यास तुझे वैयक्तीक फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली . त्या तरुणीने समाजात बदनामी होण्याच्या धाकामुळे शुभमला ३ हजार रुपये दिले . त्यानंतर तो वारंवार त्या तरुणी कडे तुझे फोटो व्हायरल करेल व तुझी समाजात बदनामी करेल अशी धमकी देऊन पैशाची मागणी करीत होता . बदनामी होऊ नये म्हणून भीतीपोटी त्या तरुणीने पुन्हा एप्रिल २०२० मध्ये रोख ५००० रुपये दिले .अशाप्रकारे शुभम बोरसे याने वारंवार त्या तरुणीस फोटो वायरल करण्याची धमकी देऊन आता पावेतो एकूण २५ हजार रुपये रोख घेतले आहेत .

अखेर असहाय्य तरुणीची सहनशिलता संपली –
२७/०९/२०२० पासून सतत शुभम सातत्याने मेसेज करून १३ हजार रुपयांची मागणी करीत होता परंतु तरुणी जवळ कोणतेही पैसे नसल्याने ती त्याला पैसे देऊ शकली नाही . म्हणून शुभमने तीला फोन वर आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. अखेर संयमाची हद्द संपताच शुभम विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी या तरुणीने पोलीसांत तक्रार दाखल केली . त्यात म्हटले आहे की , शुभम बोरसे हा वैयक्तिक फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीच्या स्वरूपात नगदी २५००० रु घेऊन पुन्हा १३००० रुपयांची मागणी करीत आहे ,जर दिले नाही तर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे, या आशयाची तक्रार तरुणीने जामनेर पोलिसांना दिली आहे .आरोपी शुभम बोरसे याच्यावर वैयक्तिक फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीच्या स्वरूपात नदी पंचवीस हजार रुपये घेऊन पुन्हा 13 हजार रुपयांची मागणी करतपैसे न दिल्यास करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद सदर तरुणीने जामनेर पोलीस ठाण्यात दिल्यावरून शुभम बोरसे या तरुणाविरुद्धभादवि १८६० अन्वये कलम ३८४ , ३८५ , ३८७ , ५०४ , ५०६ , ५०७गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस करत आहेत .