GM NEWS : कृषी वार्ता : नेरी परिसरात मक्याला फुटले अंकूर . परतीच्या पावसामुळे नुकसान .

0
411

पहूर , ता . जामनेर, दि. १३ ( शंकर भामेरे )जामनेर तालुक्यात पावसामुळे शेती मालाचे मोठे नुकसान होत असून नेरी भागात मक्याला अंकूर आले आहेत .
जामनेर तालुक्यातील पहूर , सोनाळे , नेरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे . या पावसामुळे मक्याचे प्रचंड नुकसान झाले आहे . कापूस ओला होत असल्याने त्याची गुणवत्ता घसरत आहे. परिणामी व्यापाऱ्यांकडून कवडी मोल भावाने कापसाची खरेदी होत आहे .आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी यामुळे चिंताग्रस्त झाला आहे.