GM NEWS , Big Breaking:- कांग नदी पात्रात वाहुन आला अनोळखी इसमाचा मृतदेह

0
664

जामनेर दि .१७ ( मनोज दुसाने ) : – जामनेर शहरामधुन वाहणाऱ्या कांग नदीच्या हिवरखेडा रोड वरील नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहुन आल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे .
या बाबतचे सविस्तर असे की , हिवरखेडा रस्त्याने कांग नदीच्या पात्रामधे केटीवेअर बांध आहे . या ठिकाणी भोई समाजाचे काही मासेमार करत होते . या वेळी नदीपात्रा मधुन एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह वाहुन येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . मृतदेह केटीवेअर जवळील खडकामुळे अडकला असल्याचे त्यांनी बधीतले . ही घटना या मासेमारी करणाऱ्या लोकांनी तात्काळ पोलीसांना कळवली त्यामुळे घटनास्थळी पोलीस दाखल झाले .यानंतर या अनोळखी इसमाचा मृतदेह नदीपात्रामधुन बाहेर काढण्यात आला .मृतदेहाची ओळख अदयाप पटलेली नसुन शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे . या बाबत पुढील अधिक तपास जामनेर पोलीस करत आहेत .