GM NEWS, आंदोलन वृत्त : वांजोळ्यातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यां नराधम आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी – सखी श्रावणी महिला संस्थेतर्फे प्रांताना निवेदन सादर .

0
68

भुसावळ ,दि .१५ ऑक्टोबर( मिलींद लोखंडे ) : – भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावातील नवीन भिल्ल वस्ती परीसरात राहणार्‍या पाच वर्षीय मुकबधीर अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवार १४ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेनंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ३५ वर्षीय नराधम आरोपी मंगल सीताराम भील (३५) यास अटक केली . ही घटना अतिशय घृणास्पद व निंदनीय अशी आहे . या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत तसेच
आरोपी आरोपी मंगल सीताराम भील (३५) याचे विरुद्ध लवकरात लवकर कडक कारवाई करावी खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून अँड उज्वल निकम यांची नियुक्ति करून फ़ास्ट कोर्टात खटला चालवुन ‘त्या ‘ नराधम आरोपीस फाशीचीच शिक्षा द्यावी, व
पिडित बालिकेस व तीच्या कुटुंबास न्याय द्यावा अशी मागणी सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी
अध्यक्ष सौ राजश्री नेवे , सौ माया चौधरीं , उज्वला बागुल,सौ वंदना झांबरे, सौ अनुराधा टाक, सौ स्मिता माहुरकर , दिलीप टाक, भाग्यश्री नेवे, मंदाकिनी केदारे, राजश्री बादशहा , महानंदा पाटिल , सौ प्रतिभा विसपुते , संगीता लुल्ला, रोहित महाले , अजय चौधरीं , मयुर सावकारे उपस्थित होते .