पाळधी ता.जामनेर, दि.१५ ( योगेश कोळी) : –
महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे सार्वजनिक वाचनालय बंद करण्यात आले होते.
आज डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती असून ती देशभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येते.
आज याच दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र सरकारने राज्यातील वाचनालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
पाळधी गावातील श्री गोविंद महाराज सार्वजनिक वाचनालयात भारताचे मिसाईल मेन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी श्री सुनील पाटील व भूषण पाटील यांच्या हस्ते डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला ईश्वर चोरडिया, विवेक शेळके, रवींद्र पाटील, योगेश पाटील, हर्षल पाटील व वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप पाटील यावेळी उपस्थित होते.