GM NEWS , गुन्हे वार्ता : एक कोटी रुपये द्या अन्यथा जामनेरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल बॉम्बने उडवुन देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या . आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी कडे आढळले १३ भ्रमणध्वनी .

0
1893

जामनेर,दि.१६ ( मिलींद लोखंडे) : – दि. १३ रोजी विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेले माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेने साकार झालेले जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल त्याच दिवशी १ कोटी रुपये न दिल्यास बॉम्बने उडवुन देण्याच्या धमकीचा संदेश एका अज्ञाताने माजी मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दिपक तायडे यांच्या भ्रमणध्वनीवर पाठवुन खळबळ उडवुन दिली होती .
घटनेचे गांभीर्य ओळखुन दिपक तायडे यांनी लागलीच अज्ञात आरोपी विरुद्ध जामनेर पोलीसात तक्रार दाखल केली होती तक्रारी नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध 268 / 2020 गुन्हा भाग क्रं 384, 385, 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगांव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे यांनी या प्रकरणी गुप्तता बाळगत कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवत संपुर्ण परीसराची बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून तपासणी केली होती . परंतु या ठीकाणी संशायास्पद असे काहीही आढळून न आल्याने नियोजीत कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला होता . परंतु विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत महात्वाच्या व्यक्ती उपस्थीत असणाऱ्या या हॉसीटल उद्घाटन सोहळ्यात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीला शोधुन त्याला त्वरीत जेरबंद करणे पोलीसांना आवश्यक झाले होते .
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम ब्रँच, स्थानिक गुन्हे शाखा पथक, जामनेर पोलीस यांचे संयुक्त पथक अशी ३ पथके या अज्ञात आरोपीला जेरबंद करण्यासाठी नेमण्यात आली. पथकाने पाचोरा, पिंपळगांव हरेश्वर, पहुर परिसरात शोध कार्य राबवत काही संशयीतांची चौकशी करून तांत्रीक पद्धतीने अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता पहूर पेठ येथील अमोल राजू पाटील ( वय ३२ वर्षे ) या पाचोरा आगारात कंडक्टर म्हणून काम करणाऱ्यास पोलीसांनी काल १५ रोजी अटक केली .त्याच्याजवळ १३भ्रमणध्वनी सापडले असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यास आज न्यायालयात हजर करण्यात आले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . प्रवीण मुंडे , चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे , पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे , आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम , जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे , यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या धाडसाने पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली . पोलिसांच्याया कामगिरीचे कौतुक होत आहे .


                -जाहिरात –