GM NEWS , FLASH : नवरात्रोत्सव शांततेत व साधेपणाने साजरा करुया – सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांचे आवाहन . पहूर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक . कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावकऱ्यांचे लाभतेय सहकार्य .

0
132

पहूर , ता जामनेर दि. १७( शंकर भामेरे ) : – चैतन्याचे प्रतिक असलेला नवरात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांततेत आणि साधेपणाने साजरा करूया ,असे आवाहन पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी केले .
पहूर पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते .
शनिवार १७ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे .या पार्श्वभूमीवर पहूर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली . महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचे वाढते संक्रमणलक्षात घेता राज्य शासनाने सर्वच सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे निर्देश दिले आहेत .या निर्देशानुसार सर्व जनतेने नवरात्र उत्सव साजरा करावा ,असे सांगून श्री .परदेशी म्हणाले की , मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा अधिक असू नये आगमन तसेच विसर्जनाची मिरवणूक काढू नये सजावट मंडप आटोपशीर आणि साध्या पणाने असावेत डीजे किंवा कर्णकर्कश ध्वनिक्षेपक लावू नयेत . कोरोना विषाणूच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती व्हावी ,यासाठी पोस्टर्स किंवा इतर साहित्य तयार करावे .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , अॅड . एस आर . पाटील ,ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष शैलेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले .माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , माजी उपसरपंच रवींद्र मोरे , सरपंच पती रामेश्वर पाटील , ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे , भाजपाचे माजी शहराध्यक्ष शरद बेलपत्रे , पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज जोशी , गणेश पांढरे , बीट हवलदार शशिकांत पाटील ,माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखेडे , शेख सलीम शेख गणी , मिनहाज भाई , आशिष माळी , यांच्यासह पोलीस कर्मचारी , विविध दुर्गा मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते .covid-19 च्या अनुषंगाने यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले . शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी आभार मानले .