GM NEWS , FLASH : जामनेर येथील ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलला पहूर शहर पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळाने दिली भेट . माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन आणि नगराध्यक्षा सौ. साधना महाजन यांची सदिच्छा भेट घेत जाणुन घेतली रुग्णालयातील विविध विभागांसह सुविधांची माहिती .

0
55

पहूर ,ता .जामनेर ,दि . १७ ( शंकर भामेरे) :- जामनेर येथे साकारण्यात आलेल्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलला पहूर शहर पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली . यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन , नगराध्यक्षा सौ.साधना महाजन , यांची सदिच्छा भेट घेवून आरोग्यदूत रामेश्वर नाईक, आरोग्यदूत अरविंद देशमुख यांच्याकडून रुग्णालयातील विविध सुविधांविषयी माहिती जाणून घेतली .
माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने जामनेर शहरात अत्याधुनिक ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे नुकतेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले . या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला माफक दरात उपचाराची सोय झाली आहे . आरोग्यदूत अरविंद देशमुख यांच्या निमंत्रणावरुनपहूर शहर पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयास भेट दिली . प्रसुती विभाग , नेत्र चिकित्सा विभाग , अपघात विभाग , आयसीयू विभाग , अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग , रक्तशुद्धीकरण विभाग , कर्करोग विभाग ,covid-19 विभाग अशा विविध विभागाने द्वारा रुग्णांवर माफक दरात उपचार केले जाणार आहेत .अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे . या वेळी आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी स्वतः सर्व विभागांची सखोल माहिती दिली .आमदार गिरीश महाजन यांचे पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले . यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे , उपाध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर , सचिव जयंत जोशी , शरद बेलपत्रे, मनोज जोशी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते .