GM NEWS, शैक्षणीक वृत्त : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात कौशल्य विकास अंतर्गत विविध पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश सुरु . रोजगार व स्वंयरोजगार प्राप्त करून देणाऱ्या कौशल्याधारीत अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन .

0
126

शेंदुर्णी,ता.जामनेर दि. १८ ( विलास पाटील ) : –
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी, येथे शैक्षणिक वर्ष 2020-21पासून विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली (UGC) आणि NSQF, नवी दिल्ली यांचेकडून पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर विविध B.Voc. आणि M Voc (MBA) पदवी अभ्यासक्रम मंजूर करण्यात आले आहेत. सदरील B.Voc./M. Voc पदवी अभ्यासक्रमास या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश देण्यात येणार आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांना संबंधित पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
उपलब्ध विविध अभ्यासक्रम पुढील प्रमाणे –
* B.Voc.Degree*
1) B. Voc in Entrepreneurship Development
2) B Voc in Banking, Finance and Insurance
3) B. Vov in Office Automation and E-Governance

M Voc (MBA)
1) M. Voc in Entrepreneurship Development

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
1) रोजगार व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी.
2) एम पी एस सी /यू पी एस सी व इतर स्पर्धात्मक परीक्षा करता इतर डिग्री प्रमाणे पात्रता.
3) महाविद्यालयातील प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल द्वारे परिसर मुलाखती.
.4) प्रात्यक्षिक व व्यवहार्य प्रशिक्षणावर भर.
5) नोकरीची संधी आल्यास केव्हाही कोर्स सोडून जाण्याची आणि परत कोर्स पूर्ण करण्याची सुविधा.
6) प्रवेश पात्रता बी. व्होक करिता एच एस सी व एमसीव्हीसी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण तर एम. व्होक (एमबीए) करिता कोणत्याही विद्याशाखेची पदवी
7) बीए/ बीकॉम/ बीएससी /बीसीएस पास झालेले विद्यार्थी वरील स्वयंरोजगार अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
8) कोर्ससाठी कुठलीही वयोमर्यादा नाही .
9) कोर्स करत असताना आपणास काही कारणास्तव शिक्षण पूर्ण न करता आल्यावर आपणास विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील प्रमाणपत्र मिळेल.
1) प्रथम सत्र उत्तीर्ण झाल्यास सर्टिफिकेट .
2) दुसरे सत्र उत्तीर्ण झाल्यास डिप्लोमा सर्टिफिकेट .
3) तृतीय व चौथ्या सत्र उत्तीर्ण झाल्यास ॲडव्हान्स डिप्लोमा सर्टिफिकेट .
4) पाचवे व सहावे सत्र उत्तीर्ण झाल्यास बी व्होक डिग्री सर्टिफिकेट मिळेल.
5) एम. व्होक चे प्रथम वर्ष पूर्ण केल्यास पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा प्रमाणपत्र मिळेल.
सदरील अभ्यासक्रमाच्या तासिका हे जानेवारी 21 पासून नियमित सुरुवात होणार आहे .
प्रवेश प्रक्रिया 25 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील या करिता लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रोजगार व स्वंयरोजगार प्राप्त करण्यासाठी कौशल्याधारीत अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे आवाहन धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री दादासाहेब संजयराव गरुड आणि सचिव श्री. दाजीसाहेब सतीशराव काशीद यांनी केले आहे .

संपर्क:

प्राचार्य डॉ. वासुदेव र. पाटील
9503950298

डॉ. श्याम साळुंखे
उपप्राचार्य आणि नोडल अधिकारी
9421512073
7972909085
डॉ सुजाता पाटील 9763946971
डॉ वसंत पतंगे 805847541
डॉ योगिता चौधरी 8788608921
प्रा निलेश बारी 8237337207