GM NEWS, गुन्हे वार्ता : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बनावट लेटर पॅडचा दुरुपयोग करून खंडणी मागणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी . मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष अशोक पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी केली जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल .

0
346

जामनेर ,दि .१८ (मिलिंद लोखंडे ) :-

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादाने व त्यांच्या उपस्थीतीने जळगांव जिल्ह्यात दि. १७ / १० / २० रोजी गरजुंना अन्नधान्य वाटप करण्याची बतावणी करून तसेच मनसे जिल्हानेते अॅड . जमील देशपांडे यांच्या नावाने बनावट लेटरपॅड तयार करून जामनेर तालुक्यातील सूनसगाव येथे असलेले जळगाव औरंगाबाद रस्त्याचे काम करणाऱ्या दारा इंजिनिअरींग & इन्फ्रास्ट्रक्चर प्रा . लि यांच्या कार्यालयातून प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या कडून दि १२ आक्टोबर रोजी कोविडं19 च्या मदत अनुषंगाने १५०००,₹ गजानन एंटरप्राइज या नावे मदतीचा चेक घेऊन लुबाडणुक करणाऱ्या तोतया पदाधिकाऱ्यांचे पितळ जागृत मनसे कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडे पडले आहे . बनावट लेटरपॅडच्या आधारे पक्षाचे नाव बदनाम करणाऱ्या तथाकतीत गजानन एंटरप्राईजेस या फर्मच्या संबंधीतांवर तसेच दारा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुद्धा सदर बनावट लेटरपॅड सोशल मिडीयावर प्रसिद्ध केल्याने त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसे जिल्हाउपाध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह जामनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार अर्जाव्दारे केली आहे.
या तक्रार अर्जात मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, मनसेचे बनावट लेटर पॅड व त्यावर उल्लेख असलेले भुसावळ तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या नावाचे शिक्केही बनावट असून असे अनेक ठिकाणी असे पक्षाच्या नावाने लेंटर पॅड व शिक्के वापरून खंडणी जमा केली जात असू शकते ,त्यामुळे असले बनावट लेटर पॅड व शिक्के व गजानन एंटरप्राइज या नावाने जिल्ह्यात किती ठिकाणी वसुली झाली आहे याचा तपास घेऊन अश्या खंडणी बहाद्दर यांच्यावर कारवाई करण्यात यावी ,व पक्षाची बदनामी केल्याबद्दल सूनसगाव येथील जळगांव औरंगाबाद रस्त्याचे प्रोजेक्ट मॅनेजर व कम्पनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी जामनेर पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे .
जळगांव जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणावरून असे खंडणी साठीचे बनावट लेटर पॅड व शिक्के यांचा वापर झाल्याचे लक्षात आल्यास त्वरित मनसेला संपर्क करावा व कोणतीही मदत करतांना शहानिशा करूनच मदत करण्याचे आवाहन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी जिल्ह्यातील दात्यांना केले आहे .
निवेदन देतांना मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील ,तालुका उपाध्यक्ष नाना शिंदे ,मनविसे तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील ,सागर जोशी गारखेडा आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते .