भारतीय बौद्ध महासभेच्या जामनेर शाखेची २२ सप्टेंबर रोजी महत्वपुर्ण बैठक .

0
106

जामनेर दि .१८ (मिलींद लोखंडे ) : – भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासीका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शक सुचने नुसार भा . बौ . महासभेच्या जामनेर तालुका शाखेच्या विशेष जनरल सभेचे आयोजन जामनेर शहरातील भिमनगर लुंबीनी बुद्ध विहार या ठीकाणी २२ सप्टेंबर , रविवार रोजी दु .१ वा . करण्यात आले आहे .

             या विशेष जनरल सभेच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष संघदुत तथा सुशीलकुमार हिवाळे हे असणार आहेत . तर या विशेष जनरल सभेला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय संघटक -धम्मदुत तथा डी.एस. तायडे, राज्य सचिव- सारिपुत्त तथा के .वाय. सुरवाडे , जळगांव पुर्व विभाग जि. अध्यक्ष-शैंलेंद्रजी जाधव , जिल्हा सरचिटणीस -सुमंगलजी आहिरे, जि .उपा.पर्यटन विभाग- रा . दे . निकम ( गुरूजी ) , सरंक्षण विभाग जि. उपा- युवराज नरवाडे , जि . हिशेब तपासणीस – ए.टी. सुळकर , जि . सचिव पर्यटन विभाग – मन्साराम इंगळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थीत राहणार आहेत . या विशेष जनरल सभेमधे महत्वपूर्ण विषयांवर चर्चा आणि निर्णय होणार असुन जामनेर तालुक्यातील समस्त बौद्ध धम्मीय उपासक-उपासीकांनी या सभेला उपस्थीत राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जामनेर ता .सरचिटणीस आयु. वसंतदादा लोखंडे यांनी केले आहे .