GM NEWS, ALERT: जामनेर तालुक्यातील पाळधी शिवारात बिबट्याची दहशत . शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण . वनविभाग कर्मचाऱ्यांनी केली परीसराची पाहणी.

0
1477

पाळधी,ता.जामनेर .दि २० ( योगेश कोळी )- पाळधी येथील वाघूर नदीजवळ एका शेतात कुत्र्याचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व शेतात एकटे फिरू नये असा सल्ला दिला
सध्या शेतात कपाशी वेचण्याचे काम जोरात सुरू आहे शेतकरी पावसाच्या भीतीने कापूस वेचणीसाठी सकाळी लवकर शेतात पोहचतात परंतु येथील वाघूर नदी काठच्या शेतात मोतीराम जयसिंग परदेशी यांच्या शेताला लागून मका कापणी नंतर बिबट्या व कुत्र्याची झटपट होऊन कुत्रा मृत झाला व त्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठस्से आढळले त्यामुळे शेतकऱ्यांनी जामनेर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता ती शिकार बिबट्यानेच केली असल्याचा अंदाज व्यक्त केला व शेतकऱ्यांनी सकाळी ९ वाजेनंतरच शेतात यावे तसेच एकटे फिरू नये असा सल्ला दिला यामध्ये वनरक्षक प्रसाद भारुडे, वन कर्मचारी जीवन पाटील,आनंदा ठाकरे,रमेश पाटील तसेच सरपंच सोपान सोनवणे, प्रवीण पाटील,संजय पाटील,हिरालाल परदेशी,व शेतकरी उपस्थित होते तसेच या परिसरातील अनेक वन्य प्राण्याची संख्या घटत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे .