GM NEWS, कृषी वृत्त : जामनेर तालुक्यतील गोद्री येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी(पोकरा) योजनेची आढावा बैठक संपन्न .

0
454

फत्तेपूर .ता. जामनेर . दि . २० ( सलीम पटेल ) : – गोद्री ग्रा.पं. कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी ( पोकरा )योजनेची आढावा बैठक आज संपन्न झाली .सदर योजना महाराष्ट्र शासन जागतीक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील पंधरा जिल्ह्यात राबवित असून त्यातही निवडक गावांचा समावेश करण्यात आला आहे
या योजनेत जामनेर तालुक्यातील गोद्री गावाचा समावेश आहे,यात लाभार्थ्याना तुषार सिंचन , ठिबक सिंचन .शेळी पालन शेड, पॉली हाऊस , पलटी नांगर , रोटावीटर, कुक्कुट पालन शेड , इ. योजनांचा लाभ
मिळणार आहे या प्रसंगी सेवानिवृत्त अभियंता जे.के. चव्हाण प्रशासक अशोक पालवे,मा.जि.प. सदस्य दिलीप गायकवाड , आबाजी पाटील , मंगेश पाटील ( पो. पाटील ) , अनिल घोती , ग्रा.वि. अधिकारी अमोल देशमुख , कृषी सहायक पवार , समन्वयक सिकंदर तडवी उपस्थित होते .