GM NEWS , Big Breaking :- तोंडापुर गावचा संपर्क तुटला ,परीसरात जोरदार पाऊस , धरण भरले १०० %, धरणामधुन होतोय मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग .

0
1349

तोंडापुर दि . १८,(एकनाथ कोळी / संभाजी गोतमारे) : – घाटमाथ्यावर आणि तोंडापुर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तोंडापूर गावाचा जामनेर तालुक्याशी संपर्क तुटला आहे . घाटमाथ्यासह तोंडापुर परिसरात आज सकाळी पासून जोरदार पाऊस सुरू आहे . त्यामुळे तोंडापूर मध्यम प्रकल्पातील धरणामधुन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे . नदीवर छोटा पूल असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने फत्तेपुर आणि वाकडी गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे . या ठीकाणी  वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असुन सुमारे चार ते पाच तास पुलावरून पाणी वाहत आहे .तोंडापूर धरण १०० % पाण्याने भरल्यामुळे आणि त्यातच पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणात होत असल्याने तोंडापुर परीसरातील ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली आहे . तोंडापुर गावातील नदी मोठी असल्याने या नदीवर मोठा पूल असावा अशी मागणी तोंडपूरसह परिसरात होत आहे . सद्य स्थितीमधे धरणाखाली असलेल्या खांडवा- मांडवा या गावांसह परीसरातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे .