GM NEWS , अभिनंदनिय वृत्त : जामनेर तालुक्यातील सावरले येथील विश्वनाथ काशिनाथ सुरडकर यांची अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड . सर्वच स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव .

0
372

तळेगांव ता.जामनेर ,दि .२१ ( डॉ. गजानन जाधव ) : – जामनेर तालुक्यातील सावरले येथील विश्वनाथ काशिनाथ सुरडकर यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे .
पोलीस दलातील सर्व स्तरावरच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक कार्यातून सदैव तत्पर असलेल्या अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विश्वनाथ काशिनाथ सुरडकर यांचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक श्रीनिवास इंदुरकर ,राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश इंदुरकर , राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले .त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे . GM NEWS न्यूज परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन !

“ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे देशातील पोलीसच नव्हे तर सर्व सुरक्षा विभागांना कायद्याने आपल्या मागण्यांसाठी संघटन करण्याचे अधिकार दिलेले नाहीत. इतर विभागापेक्षा जास्त वेळ समाजाच्या सुरक्षे साठी देणारा हा पोलीस विभाग सण उत्सव, निवडणूका, आपत्कालीन परीस्थीती अशा सर्व वेळी या विभागातील सर्व महीला व पुरुष कर्मचारी रात्रंदिवस घराबाहेर आपल्या सुरक्षेसाठी उभे असतात.
आणि याच विभागाला सर्वात जास्त भ्रष्ट असण्याचा डागही लावला जातो.
पण हा विभाग भ्रष्ट का ?याचे कारण कोणीही जानुन घेण्याचा प्रयत्न करत नाही.
सर्व विभांगा पेक्षा जास्त वेळ काम आणि पगार मात्र तुलनेत कमी. कर्मचाऱ्यांना तालुका स्तरावर गाव स्तरावर राहाण्यासाठी सुविधायुक्त घरांची कमतरता, काही कर्मचाऱ्यांना तर शासकिय घरे निवाऱ्याला उपलब्ध ही होत नाहीत. राज्यात संखेने पोलीस बळ कमी प्रमाणात गुन्हे जास्त. महिला कर्मचाऱ्यांना कामांच्या वेळे बाबत होणारा त्रास व इतर त्यांची प्रश्न. पोलीस कारवाईत होणारा राजकीय हस्तक्षेप. पोलीस विभागावर असनारा राजकिय दबाव.
आमदार खासदार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना होणारी मारहान, पोलीस कर्मचाऱ्यांना मिळनारी चुकीची वागणुक, पोलीस विभागाची समाजात असलेली प्रतीमा, प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांच्या अवेळी होणाऱ्या बदल्या अशा अनेक प्रश्नांना सोडवन्या साठी ही संघटना पुर्ण ताकतीने या विभागा सोबत कायम उभी रहानार आहे. आणि हे सर्व प्रश्न पुढे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या संघटन कौश्यल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कायदेशीर मार्गाने धरणे, उपोषणे, आंदोलने, मोर्चे यांचे नियोजन करून शासन स्तरावरून हे प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत..
या सर्व कार्यासाठी संघटनेची प्रथम मजबुत बांधनी ती ही सर्व स्तरापर्यंत ची हवी त्यानंतरच आपण प्रत्यक्ष या सर्व प्रश्नांना सोडवन्याचा प्रयत्न करणार आहोत.

विश्वनाथ काशिनाथ सुरडकर ,
जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ,
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य .

[