जामनेर तालुका माहेश्वरी समाजाच्या अध्यक्षपदी डॉ . सचिन बसेर यांची बिनविरोध निवड .

0
37

जामनेर दि .२० ( ईश्वर चौधरी ) :- जामनेर तालुक्यातील माहेश्वरी समाजाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ . सचिन बसेर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
माहेश्वरी समाजाच्या वार्षीक कार्यकारणी बैठकीचे आयोजन डॉ .पंढरीनाथ बसेर यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते . या बैठकी मधे समाजाचे जिल्हा निवडणुक अधिकारी श्री .बंकटजी लढदा यांच्या निरीक्षणाखाली डॉ . सचिन बसेर यांची जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून सर्व समाज बांधवांनी बिनविरोध निवड केली आहे . तर ता .सचिव पदी चेतन लखोटे , शहर सचिव पदी दिलीप कलंत्री , उपाध्यक्ष पदी मनोजकुमार बसेर , या समाज बांधवांची सुध्दा बिनविरोध निवड करण्यात आली आहे . या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजाचे जेष्ठ मान्यवर श्री . सोमाणीजी, जिल्हा प्रतिनिधी गुलाबचंदजी झंवर यांची प्रमुख उपस्थीती होती . जामनेर तालुक्यातील नवनिर्वाचीत कार्यकारणीचे समस्त माहेश्वरी समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे .