कांग नदी पात्रात १७ सप्टें रोजी आढळलेला ‘तो ‘ मृतदेह देऊळगांवच्या ईश्वर राठोड यांचा .

0
255

जामनेर दि .१९ ( प्रतिनिधी ) :- जामनेर शहरा जवळील हिवरखेडा रस्त्यावरील कांग नदीपात्रा मधे एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहुन आल्याची खळबळजनक घटना दि .१७ रोजी उडकीस आली होती . या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असुन हा मृतदेह देऊळगांव येथील ईश्वर ममराज राठोड ( वय ३६ ) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे .

मृत ईश्वर राठोड हा मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा युवक  असुन त्याची सासरवाडी अंबिलहोळ येथील आहे .पत्नी आणि मुल माहेरी असल्यामुळे तो त्यांना भेटायला १५ ता . ला अंबिलहोळ येथे निघाला होता .परंतु रात्री उशीर झाल्यामुळे तो पायीच भुसावळ रस्त्याने निघाला असावा . त्यानंतर त्याचा मृतदेहच १७ तारखेला वाहुन आला होता .मृत ईश्वर हा सासरवाडी अंबिलहोळ येथे असेल असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले तर तो घरी देऊळगांवला असेल असे सासुरवाडीतील लोकांना वाटले . त्यामुळे या घटनेची खबर कोणाला लवकर कळली नाही. या घटनेची अकस्मात मृत्यु म्हणून जामनेर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली . मृतदेहाची ओळख न पटल्यामुळे आणि मृतदेह पाण्याने फुगलेला असल्याने दोन दिवसा नंतर मृतदेहावर जामनेर पोलीसांनी विधीवत अंत्यसंस्कार सुध्दा केला .परंतु सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या मृतदेहाच्या फोटोंमुळे त्याची ओळख पटली आहे . मृत ईश्वर राठोड याला पत्नी ,२ मुली १ मुलगा असुन त्याचा कोणाशी वाद सुध्दा नव्हता .कुटुंबीयांची या घटने बाबत कोणतेही तक्रार अथवा संशय नसुन, त्याचा मृत्यु हा शौचास बसतांना पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे झाला असल्याची शक्यता आहे .