GM NEWS , सेवापूर्ती वृत्त : पहूर येथील सेवाभावी व्यक्तिमत्व अनंत (हेमंतदादा ) जोशी ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त . आयडीबीआय बँकेत पहूरसह जामनेर , औरंगाबाद ,कुऱ्हे पानाचे आदी ठिकाणी बजवली सेवा . पहूर येथील आयडीबीआय बैंकेने दिला भावपूर्ण निरोप .

0
199

पहूर , ता . जामनेर , दि . ३१ ( शंकर भामेरे ) :- पहूर येथील सेवाभावी व्यक्तिमत्व अनंत (हेमंत दादा ) शंकर जोशी हे ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज (ता. ३१ )आयडीबीआय बँकेतून सेवानिवृत्त झाले .
हेमंत दादा जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले .माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या अर्थसहाय्यातून त्यांनी वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाचे शुल्क भरून ते पदवीधर झाले .बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्यांच्यावर आहेत . आयडीबीआय बँकेत कॅशियर पदावर त्यांनी ३७ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली . १९८३मध्ये चोपडा येथे सेवेत रुजू झाले .त्यानंतर पहूर ,जामनेर, औरंगाबाद, कुऱ्हे पानाचे आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजाविली. आज ३१ रोजी त्यांना आयडीबीआय बँकेच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला .त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला .
यावेळी शाखा व्यवस्थापक मोहन चव्हाण ,
निखिल जोशी ( SOM ),
शरद बारी ( asset officer ), बैंक अधिकारी
कृष्णा राजपूत ,
डाॅ.अनिकेत लेले, सुरेश बेढे , राहूल घरोटे, ज्ञानेश्वर देशमुख , महेश सोनवणे ,सुरेश राऊत, बॅंकेचे माजी कर्मचारी बी. आर पाटील व दिलीप घरोटे , प्रकाश जोशी , मोहन जोशी आदी उपस्थित होते. GM NEWS परिवाराच्या वतीने त्यांना निरोगी .. निरामय दिर्घायुरोग्यासाठी मंगलमय शुभेच्छा !