GM NEWS , FLASH , जामनेर तालुक्यात महार्षी वाल्मीकी ऋषींना जयंतीनिमित्त अभिवादन . शासकीय नियमांचे केले पालन .

0
233

जामनेर , दि. ३१ ( योगेश कोळी ) :- जामनेर येथे महर्षी वाल्मिकी यांची जयंती शासकीय नियमांचे पालन करून करण्यात आली . या वर्षी शासनाचे नियमाचे पालन करून कोरोना संसर्ग महामारी लक्षात घेता साध्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आली .कुठलीही मिरवणुक न काढता , गाजावाजा न करता घराघरात रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले .गर्दी न करता सोशल अंतर ठेवुन , जामनेरसह ग्रामीण भागातील सामाजबांधवातर्फे कार्यक्रमांव्दारे समाजबांधवातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी महर्षी वाल्मीक ऋषीच्या प्रतिमेचे पुजन माजी सभापती पती तसेच पाळधी गावाचे मा.सरपंच कमलाकर पाटील,आर.टी.पाडळसे,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा नाशिक,विनोद जाधव,बी.आर.पाटील,दिनेश वाघ,विनोद कोळी,भानुदास चव्हाण ,विनोद पाटील,राहुल पाडळसे,प्रणव धायडे,सुरेश सोनवणे,आकुश कोळी,यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले.ग्रामस्थ व सामाजबांधवा उपस्थित होते.