GM NEWS, अभिनंदनीय वृत्त : लोकवर्गणीतून मिळणार धरणगाव क्रीडासंकुलाच्या कामाला गती. खेळाडू व क्रीडा शिक्षक यांच्या मागणीला लोकवर्गणीच्या माध्यमातून यश.

0
202

दि .१ नोव्हेंबर

निलेश पवार
धरणगाव प्रतिनिधी-:येथील तालुका क्रीडा संकुलसाठी १ कोटी रुपये मंजूर झाले होते. १ कोटी रुपये निधीपैकी ९५ लक्ष रुपये खर्च झाले असून त्यापैकी ५ लक्ष रुपये खेळाडूंच्या साहित्यासाठी शिल्लक आहे. क्रीडा संकुलाचे काम निधीअभावी अपूर्ण असून खेळाडू व जेष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील , लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी लोकवर्गणीतुन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांनी मार्चपर्यंत निधी उपलब्ध होईल तोपर्यंत लोकवर्गणीतून संकुलासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे , अशी माहिती माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर यांनी दिली. गावातील सर्व क्रीडाशिक्षक क्रीडासंकुल च्या कामासाठी परिश्रम घेत आहेत.
यावेळी क्रीडासंकुलच्या पाहणी प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी , माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर , भानुदास विसावे , कैलास माळी , एस. एल. सूर्यवंशी , जितेंद्र ओस्तवाल , व्ही. पी. महाले , आर. बी. महाले , हेमंत माळी , के.एस.पाटील , संदेश महानुभाव , डी. एन. पाटील , एन. वाय.पाटील , विकास शिरसाठ , विजय महाजन आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.