GM NEWS, आंदोलन वृत्त : धरणगांव शहरातील राष्ट्रपिता ज्योतीराव फुले चौक असे नामकरण करावे. श्री.संत सावता माळी युवक संघ धरणगावच्या वतीने निवेदन सादर.

0
146

दि . १ नोव्हेंबर
निलेश पवार
धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव येथील धरणी बाजारात राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे स्मारक असल्याने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले चौक असे नामकरण करण्यात यावे, व स्मारक समोरील असलेल्या उघड्या नाल्यावर स्लॅब टाकण्यात यावा, म्हणून श्री.संत सावता माळी युवक संघातर्फे तालुकाध्यक्ष निलेश माळी व असंख्य कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष निलेश चौधरी व मुख्याधिकारी यांच्या वतीने नपाचे वरिष्ठ लिपिक प्रणव पाटील यांनी निवेदन स्विकारले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, नगरसेवक राजेंद्र महाजन, नगरसेवक विजय महाजन, पुण्यनगरीचे जितेंद्र महाजन, बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, हेमंत माळी, तालुका वैद्यकीय अध्यक्ष डॉ.देवकीनंदन वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, लोकशाहीचे पत्रकार विनोद रोकडे, शहराध्यक्ष जयेश महाजन, सल्लागार विनायक महाजन, गजानन महाजन, गुलाब महाजन, दिनेश महाजन, नितीन महाजन, समाधान महाजन, प्रशांत महाजन, निलेश महाले, राकेश महाजन, यशोदिप महाजन, राहुल रोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.