GM NEWS, कृषी वृत्त : भरड धान्य खरेदी साठी २ नोव्हेबर पासुन शेतकऱ्यांनी नावे नोंदणी होणार . जामनेर शेतकरी सह. संघा तर्फे नाव नोंदणी साठी आवाहन .

0
524

जामनेर,दि.१ नोव्हेबर ( मिलींद लोखंडे ) : – खरीप हंगाम किमान आधारभुत किंमत योजने अंतर्गत आधारभुत धान्य खरेदी योजना शासन निर्णया प्रमाणे भरडधान्य ( मका FAQ व ज्वारी FAQ ) खरेदी साठी दि .१ नाव्हेबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सुरु करण्यात आली आहे .
शेतकरी बांधवांनी त्यांच्या ज्वारी व मका विक्रीच्या नोंदणी साठी करायची असेल त्यांनी २ नोव्हेंबर पासुन शेतकरी सह. संघ लि. जामनेर कार्यालयात ७ / १२ उतारा ( ऑनलाईन पिक पेरा असणे गरजेचे ), आधार कार्ड झेरॉक्स प्रत, बँक पासबुक झेरॉक्स प्रत सोबत घेऊन कार्यालयीन वेळेत हजर राहण्याचे आवाहन शेतकरी संघ लि. जामनेरचे अध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांनी केले आहे.