निलेश पवार
धरणगाव, प्रतिनिधी, दि. ३ : – धरणगाव येथील शेतकरी गोरख शिवाजी देशमुख यांनी मुकेश ऍग्रो एजन्सी धरणगाव येथील दुकानदाराकडून पक्के बिल घेवून राशी निओ ५७८ BG कंपनीचे ३ बॅग (कापूस) बियाणे खरेदी केले. व एकाच दिवशी राशी निओ ५७८ कापूस वाणाची शेतात लागवड केली.
संबंधित शेतकऱ्याचा शेतात बियाणे लागवड केल्यानंतर आज उत्पादन येण्याचा वेळेस एकाच शेतात दोन प्रकारचे प्लांट पडलेले आहेत. त्याच्यात अर्धे बियाणे खराब व अर्धे बियाणे चांगले निघाले आहेत. जवळजवळ अर्ध्यावर क्षेत्रात फुलपाती व बोंडे लागली नाहीत व झाड लवकर लाल झाले, ह्यासंबंधी राशी कंपनीच्या प्रतिनिधींना बियाणे संदर्भात गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी व दुकानदार फोनवर संपर्क करीत आहेत. राशी कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्याला दोन महिन्यापासून येऊन फक्त आश्वासन देत होते की, आम्ही वरिष्ठ स्तरावर कळवितो. आमचे वरचे अधिकारी येणार आहेत. ते ह्या संदर्भात नक्कीच निर्णय घेतील. असे टाळाटाळ करून वेळकाढु भूमिका घेतली.
तसेच धरणगाव येथील कृषी अधिकारी , संशोधक , व त्यांचा संपूर्ण संघ शेतात पाहणी करून गेले असता अद्यापपावेतो कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्याला माहिती दिली नाही.
शेतकऱ्याचा स्वभाव साधा भोळा असल्याने राशी निओ ५७८ BG कंपनीच्या प्रतिनिधींनी बदमाशगिरी करून शेतकऱ्यास दोन महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचा न्याय न देण्याचा भूमिकेतून शेतकऱ्याला कुठलीही मदत केली नाही. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन महिन्यानंतर शेतकऱ्याने संपर्क साधला असता तुझ्याने जे होईल ते करून घे , आमच्या राशी कंपनीकडे तुझ्यासारख्या करिता वकील आहेत, अशी अरेरावीची भाषा वापरली. व आता टेक्निकल बाबतीत आमची कंपनी सुरक्षित आहे. असे म्हणून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले..
शेतकऱ्याने आता काय करावं..? परिवाराला कसं पोसावं..? असा यक्षप्रश्न समोर आहे.
शेतकरी खूप हताश झाल्याने त्यांची मानसिक परिस्थितीचा विचार करावा, शासनाने राशी कंपनीला व प्रतिनिधींना वठणीवर आणावे.
मला न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करणार अशी माहिती शेतकऱ्याने दिली.