GM NEWS , गुन्हे वार्ता : तोंडापूर येथील दारू अड्डयावर पहूर पोलिसांचा छापा . पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांची कारवाई . दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल .

0
394

पहूर , ता. जामनेर, दि. ११ ( शंकर भामेरे ) :- जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या तोंडापूर भागात दारु अड्डयावर पहूर पोलिसांनी छापा टाकून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
पहूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी पदाची सूत्रे हाती घेताच अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून तोंडापूर येथील दारू अड्डयावर छापा टाकत दारू बनवण्यासाठी असलेले रसायन नष्ट केले .याप्रकरणी लताबाई वडर आणि इमरान शेख (रा. तोंडापूर )यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली आहे .या कारवाई बद्दल नागरिकांमधून पोलीसांचे कौतुक होत आहे .