GM NEWS , Big Breaking:- वाघुर नदीला आला दशकातील सर्वात मोठा पुर, वाघुर धरण १०० % भरणाच्या मार्गावर .हिवरी-हिवरखेडा गावांचा संपर्क तुटला .

0
36

पहुर दि .२० ( संतोष पांढरे ) : – जामनेर तालुक्यातुन वाहणाऱ्या वाघुर नदीला या दशकातील  सर्वात मोठा पुर आल्यामुळे वाघुर नदी दुथळी भरून वाहत आहे . काल रात्री पासुन वाघुर नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे  हिवरी व हिवरखेडा गावाचा संपर्क तुटला आहे .नेरी गावात सुध्दा नदीने रौद्र रूप धारण केले असुन जळगांव -औरंगाबाद महामार्गावरील पुलावर पुर पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केल्याने वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे . वाघुर नदीच्या पात्रामधे बांधण्यात आलेले वाघुर धरण १०० % पाण्याने भरण्याच्या मार्गावर असुन लगतच्या गावांना प्रशासनाने दक्षतेचा इशारा दीला आहे .

जगप्रसिध्द अंजिठा लेणीच़्या कुशीतुन उगम पावलेल्या वाघुर नदीस डोंगररांगेत झालेल्या पावसामुळे काल दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास नदीला दशकातील   सर्वात मोठा पुर येऊन हिवरी व हिवरखेडा या गावांचा संपर्क तुटला .आहे वाघुर नदीच्या पुराने पिंपळगाव बु ,हिवरी ,हिवरखेडा ,पहुर,अशा गावाजवळ नदी काठच्या घरांंमधे पाणी शिरले आहे . पिंपळगावासह परिसरात गेल्या आठ ते दहा वर्षात ऐवढा पाऊस झाला नाही त्यामुळे संपुर्ण पावसाळ्यात यंदा प्रथमच वाघुर नदी खळाळुन ओसंडुन वाहत आहे .वाघुर नदी पात्रालगत असलेली स्मशानभुमी ला पुराच्या  पाण्याखाली आली आहेे .सततधार पाऊसाने परिसरात असलेल्या सर्व नाले वाहत असुन यंदा तब्बल दहा ते बारा वेळेस वाघुर नदीला पुर आला होता परंतु आजचा आलेला वाघुर नदीस पुर हा खुप मोठा होता .पुर पाहण्यासाठी वाघुर नदीच्या पुलावर गावकर्यानी दोन्ही बाजुला गर्दी केली होती . नदीीच्या प्रवाहामुळे गावातील ओढे सुध्दा खळाळुन वाहत असल्याने जामनेर तालुुक्यातीता  हिवरी  -हिवरखेडा या गावांचा संपर्क तुटला आहे . येथे पुल बांधण्याची मागनी प्रलंबीत असुन गावकर्याना खुप त्रास सहन करावा लागत आहे .