GM NEWS , गुन्हे वार्ता : दिवाळीसाठी पाचोरा येथे गेलेल्या शिक्षकाच्या घरी चोरी . पहूर येथील संतोषीमातानगरातील घटना . ठसे तज्ज्ञ ,श्वान पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल.

0
990

पहूर ,ता .जामनेर, दि. १७ ( शंकर भामेरे ) :-अज्ञात चोरट्यांनी शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून पाचशे रुपये लंपास केल्याची घटना पहूर येथील संतोषीमातानगरात आज (ता .१७) मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली .
याबाबत अधिक माहिती अशी की , पहूर पेठ येथील संतोषीमाता नगरातील रहीवासी तसेच मोराड येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस असलेले भानुदास भागवत पाटील हे दिवाळी निमित्त दि १२ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता पाचोरा येथे आपल्या आई-वडिलांकडे गेले होते .
चोरट्यांनी हीच संधी साधत त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करत सामान अस्थाव्यस्त करून कपाटाचे कुलूप तोडले व लॉकर मधील पाचशे रुपये चोरून नेले .
आज मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या सुनिल विठ्ठल कुमावत यांना श्री पाटील यांचे घर उघडे दिसल्या वरून त्यांना संशय बळावला . त्यांनी शहानिशा केली असता शिक्षक भानुदास पाटील हे पाचोर्‍याला असल्याचे समजले . त्यांनी सदर माहिती देताच भानुदास पाटीलकुटूंबियांसोबत आपल्या घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे आढळून आले .घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देवून पाहणी केली .
अज्ञात चोरट्यांनी लॉकर मधून ५०० रुपयांसह कुलूप लंपास केल्याचे शिक्षक भानुदास पाटील पोलीसांना सांगीतले .
याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवी ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे करीत आहेत .
दरम्यान ,जळगांव पोलीस दलाचे श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते .श्वान पथकाने संतोषीमातानगर , शिवनगर मुख्य रस्त्यापर्यंत माग दाखविला .
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली .
मागील महिन्यात पहूर येथे १५ लाखांची घरफोडी झाली होती . तसेच श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे ही अज्ञात चोरट्याने दिवाळीच्या रात्री आठ नऊ च्या सुमारास भाविकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला .या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढविण्याची आवश्यकता असून चोरट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे .