GM NEWS , हृदयद्रावक वृत्त : जामनेर तालुक्यातील वाघारी येथील पिता – पुत्राचा अपघातात दुर्देवी मृत्यू .नेरी दिगर येथील चौफुलीवर मोटार सायकलला दिली मागून येणाऱ्या ट्रकने धडक . ट्रकचे पुढील चाक अंगावरून गेल्याने सोडले जागीच प्राण . शोकाकूल वातावरणात झाला दफनविधी .

0
150

जामनेर , दि . ( विलास ढाकरे / सचिन तायडे ) : –
जामनेर तालुक्यातील वाघारी येथील पिता-पुत्र मोटरसायकल अपघातात जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना आज मंगळवारी (ता. १७ ) नेरी येथे घडली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , वाघारी येथील रहिवासी शेख आबीद शेख रशिद कुरेशी (वय २५ वर्षे) व शेख रशीद शेख कालू कुरेशी (वय – ६ ५ वर्षे ) हे पिता पुत्र वाघारी कडून नेरी कडे मोटर सायकल द्वारे ( क्र .एम एच १९ डी एल ४४ ६ ५ ) जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने ( क्र . जी जे १५ यु . यु १७३५ ) हॉटेल पायल गार्डन जवळ जोरात धडक दिल्याने मोटरसायकल वरील पितापुत्र खाली कोसळले आणि त्यांच्या अंगावरून ट्रकचे पुढील टायर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . ही घटना नेरी दिगर येथे हॉटेल पायल गार्डन चौफुली जवळ आज सकाळी ७ -३० वाजेच्या सुमारास घडली . घटना घडताच वाघरी येथीलच रहिवासी असलेले गुरांचे व्यापारी हेही मोटरसायकल द्वारे त्यांच्या मागाहून प्रवास करत होते .त्यांनी सदर घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवली .आपल्याच गावातील पिता-पुत्र दुर्दैवी अपघातात डोळ्यासमोर मृत्यूमुखी पडल्याने अक्षरश : त्यांच्या अंगावर रोमांच दाटले .
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक गोळा झाले आणि त्यांनी दवाखान्यात नेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले .
गर्दीचा फायदा घेत ट्रक चालक ट्रक जागेवरच सोडून पसार झाला .परंतु घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले वाघारी येथील गुरांचे व्यापारीशेख गफुर शेख सांडू यांनी ट्रक चालकाला पहिले असल्याने त्याला समोर आणले असता ते त्याला ओळखू शकतील असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे .याप्रकरणी शेख गपुर शेख सांडू कुरेशी (वय – ४ ३ वर्षे )यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय दंड विधान संहिताकलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जामनेर पोलिस करत आहेत या घटनेमुळे वाघारी येथे शोककळा पसरली असून शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला .