पहुरच्या वाघुर नदीत तरुणाचा बुडून मृत्यु .

0
98

पहुर दि .२१ ( संतोष पांढरेेे ) : -जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील रहिवासी शेख शाहरुख शेख आयुब खाटीक 27 हा तरुण आज सकाळी वाघुर नदी जवळ प्रांत विधी करण्यासाठी गेला असता, त्याच्या बाजूला असलेल्या डोहामध्ये त्याचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची करुण घटना आज घडली आहे . या तराणाला  पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले केतन जाधव व संजय बाविस्कर या तरुणांनी त्याला वाचविण्याचा अतोनात प्रयत्न केला परंतु या दोघांना शेख शाहरुख शेख आयुब खाटीक दहा ते पंधरा मिनिटं नदीमध्ये पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे खाली तळाशी दबल्यामुळे या दोघा तरुणांना दहा ते पंधरा मिनिटं दिसला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असून त्याला यातून बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालय उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टर संदीप कुमावत यांनी त्याची तपासणी केली. त्याच्या नाकातोंडात डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू घोषित करण्यात आला. शेख शाहरुख खाटीक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पश्चात आई वडील पत्नी एक वर्षाची मुलगी असा परिवार असून तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह मटण मार्केटमध्ये कामगार म्हणून करीत होता त्याच्या या दुर्दैवी घटनेमुळे पहूर शहरावर शोककळा पसरली असून,हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.