जामनेर,दि. २२ ( ईश्वर चौधरी ) :- जामनेर शहरातील त्रिनेत्र गिताई सेवा संस्था संचलित ‘व्दारका अन्नछत्रालय’ या सेवा केंद्राचा शुभारंभ मा.नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या शुभहस्ते दि.२३ सप्टेेंबर २०१९ सोमवार रोजी सकाळी १०.३० वा. नगर परिषद चौक या ठिकाणी होणार आहे.
संस्थेेने गोर-गरीब गरजु व रुग्णांच्या सेवेसाठी ‘द्वारका अन्नछत्रालय’ द्वारे हा सेवाभावी उपक्रम सुरु केला असुन या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या धान्य-मसाल्यांचा उपयोग करून मना नफा ना तोटाफ या तत्वावर फक्त २५ रुपयांमध्ये स्वादिष्ट जेवणाची पार्सल सेवा देण्यात येणार आहे.
संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन त्रिनेत्र गीताई सेवा संस्थेच्या संचालक मंडळााच्य वतीने करण्यात आहे.
Home आपलं जळगाव गरजुंना मिळणार फक्त २५ रुपयांमध्ये रुचकर जेवण. द्वारका अन्नछत्रालयाचा दि.२३ सप्टेंबर रोजी...