GM NEWS, दुःखद घटना : उपक्रमशिल आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह एरंडोल तालुक्यातील पळसदळ शिवारात आढळुन आल्याने खळबळ . किशोर पाटील कुंझरकरांचा अपघात ? की घातपात ?

0
964

एरंडोल – धरणगांव,दि. ९ ( निलेश पवार ) : –
एरंडोल तालुक्यातील गालापुर जि.प. मराठी शाळेत शिक्षक असलेले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशिल शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आज सकाळी संशयास्पदरित्या पळसदळ शिवारात आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, किशोर पाटील कुंझरकर हे एरंडोल तालुक्यातील गालापुर येथील मराठी शाळेत शिक्षक होते .तसेच त्यांच्या पत्नी सुद्धा शिक्षीका आहेत . दोघही उपक्रमशिल शिक्षक दाम्पत्य असुन शैक्षणीक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहायचे .
किशोर पाटील कुंझरकर यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल केला आहे . अशा या आदर्श व्यक्तीमत्वाचा अचानकपणे आज सकाळी मृतदेह आढळून आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे .किशोर पाटील कुंझरकर हे आज सकाळी 3. 30 वाजेच्या सुमारास घरामधुन बाहेर पडल्याची चर्चा आहे . तर ते काल पासुनच गालापुर येथील शाळेमधुन घरी आले नसल्याची पण चर्चा आहे . दरम्यान मंगळवारी त्यांनी भुसावळ येथे राजकीय नेते अनिल चौधरी यांच्या वाढदिवसाला सुद्धा हजेरी लावली असल्याचे समजते .
किशोर पाटील कुंझरकर हे नेमके पळसदळ शिवारात का गेले ? या बाबत पोलीस प्रशासन तपास करत आहे . मृतदेहला खरचटल्याच्या खुना आढळुन आल्या असुन त्यांचे अंगावतील बनीयान सुद्धा फाटले आहे. त्यामुळे या ठीकाणी त्यांची कोणाशी तरी झटापट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही .
किशोर पाटील कुंझरकर हे मितभाषी व्यक्तीमत्व सहज कोणालाही आपलेस करणारे होते . शिक्षकांच्या संघटनेचे ते राज्य समन्वयक होते .अनेक सामाजिक – शैक्षणीक उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा . कोरोना लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणुन त्यांनी ‘घर घर शाळा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ज्ञानादानाचे कार्य केले . या कार्यात त्यांच्या सौभाग्यवतींची सुद्धा त्यांना मोलाची साथ होती . त्यांच्या या सर्व उपक्रमांची दखल सर्व प्रसार माध्यमं नेहमी घ्यायचे .
अशा आदर्श शिक्षकाचा अचानकपणे मृतदेह आढळुन आल्याने शैक्षणीक क्षेत्रात खळबळ उडाली आहे . दरम्यान घटनेची एरंडोल पोलीस चौकशी करत असुन घडलेल्या दुर्देवी घटनेचे सत्य लवकरच उघड होणार आहे .

विद्यार्थी प्रिय शिक्षक –
आदर्श शिक्षक असलेले किशोर पाटील विद्यार्थीप्रिय शिक्षक होते .शिक्षण क्षेत्रातील नवविचार प्रवाह आणि आव्हाने आहेत यांना समर्थपणे पेलून विद्यार्थी हित केंद्रबिंदू मानून ते सदैव प्रयत्न करत राहायचे .विद्यार्थ्या सोबतच शिक्षकांचेही ते सदैव पाठीशी राहायचे .राज्यातील विविध २५ पेक्षा अधिक शैक्षणिक संघटनांचेते राज्य समन्वयक म्हणून यशस्वी रीत्या आपल्या खांद्यावर धुरा संभाळत होते .त्यांच्या अकस्मात जाण्याने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे .