GM NEWS FLASH : प्रत्येक नागरिकाने ‘माझी वसुंधरा ‘ अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा : गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांचे आवाहन . पहूर पेठ येथे माझी वसुंधरा अभियानासंदर्भात नियोजन बैठक .

0
238

पहूर , ता .जामनेर (शंकर भामेरे ) निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांशी अशा माझी वसुंधरा अभियानात पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीची निवड झाली असून पुढील कार्यवाही संदर्भात आज शुक्रवारी (ता .११ ) गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले .
पृथ्वी , वायू ,अग्नी ,आकाश, आणि जल या नैसर्गिक पंचतत्त्वांचे सजीव सृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे .या पंचतत्वांचे महत्त्व जाणून आपण विकास साधला पाहिजे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे . माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात आज गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली .यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शक सूचना करून प्रत्येक नागरिकाने यात स्वतःचा सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले .याप्रसंगी पंचायत समिती कृषी अधिकारी एन. आर .पाटील , ग्राम विस्तार अधिकारी एस. जी .बैरागी ,सुनील मोरे,केंद्र प्रमुख भानुदास तायडे , सरपंच निताताई पाटील ,ग्रामविकास अधिकारी डी .पी. टेमकर , रामेश्वर पाटील , गणेश पांढरे मुख्याध्यापक रवींद्र खोडपे, ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षक, अंगणवाडी सेविका ,आशा सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.