GM NEWS, अभिनंदनीय वृत्त : ‘महात्मा गांधी दर्शन’ पुरस्कार मुंबई येथे मोठ्या थाटामाटात संपन्न . समाजसेवक सुमित पंडित व गजानन क्षीरसागर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र ट्रॉफी व सुवर्णपदक प्रदान .

0
119

पाळधी,ता.जामनेर,दि.११ डिसेंबर ( योगेश कोळी ) : –
आनंदश्री ऑर्गनायजेशन संस्थे मार्फत आयोजित कार्यक्रमात समाजसेवक सुमित पंडित व गजानन क्षिरसागर यांना सामाजिक, मानव अधीकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्या बद्दल ‘महात्मा गांधी दर्शन पुरस्कार 2020’ देऊन गुणगैरव करण्यात आले.राज्यस्तरीय व राष्ट सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित व जळगावचे गजानन क्षिरसागर यांना महात्मा गांधी दर्शन पुरस्कार प्रदान करन्यात आला आहे.यात कला, क्रीडा,साहित्य, शैक्षणिक, सामाजिक,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व आकर्षक प्रमाणपत्र व गांधी सन्मानचिन्ह ( महात्मा गांधी 4″ COIN ) देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक:पद्मश्री डाॅक्टर विजय शाह( गांधीवादी )श्री. लक्ष्मण गोले( गांधी विचारवादी )श्रीमती डाॅक्टर संगीता गिरीश नाईक
( गांधी विचारवादी )श्री. सुदर्शन सबत
( मास्टर माईन्ड ट्रेनर )चेतन पाटील माणुसकी समुहाचे जळगाव जील्हा उपाध्यक्ष आदि मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली.सागर इन्ट्रानॅशनल हाॅटेल,
सरिता हाॅल, कल्याण स्टेशन जवळ, कल्याण ( प ) महाराष्ट्र. येथे, हा पुरस्कार सोहळा दि. 10/12/2020 रोजी मुंबई येथे सांय 3.30 वा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सुमित पंडित यांचा हा 56 वा पुरस्कार होता याआधी त्याना महाराष्ट्र विविध 55 व गजानन क्षीरसागर यांना 13 पुरस्काराने सन्मानित करन्यात आले आहे.या पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गजानन व सुमित यांचे कौतुक होत आहे.