GM NEWS, गुन्हे वार्ता: वाकोद येथील तरुणाच्या खून प्रकरणी तिसऱ्या संशयीतास अटक. आरोपी वाढण्याची शक्यता .

0
1414

पहुर,ता.जामनेर,दि. २९ ( शंकर भामेरे ) :-
गेल्या शनिवारी एकुलती-लोहारा रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या भिंती जवळ दुपारच्या सुमारास वाकोदचा २७वर्षीय  तरुण रवींद्र महाले यास जीवे ठार मारून बेवारस पणे फेकून देण्यात आले होते. या खूनाचा पहुर पोलिसांनी छडा लावून दोन संशयीतास अटक करून त्यांना जामनेर न्यायालयात हजर करण्यात येऊन न्यायालयाने५दिवसांची कोठडी सुनावली असतांनाच आज या प्रकरणातील मुख्य सुत्रधार योगेश आस्कर याचा शालक सतिश उर्फ पवन भानुदास देशमुख रा.रोटवद ता.जामनेर यास पोलिसांनी अटक केली असून योगेश आस्कर व अभिषेक पाटील सह आरोपींची संख्या आता तीन झाली असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे.या प्रकरणाची चौकशी स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे हे करीत असून ते पहुर येथे तळ ठोकून आहेत. 
दरम्यान या खून प्रकरणात अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खूनामागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी अनैतिक सबंधाच्या संशयावरून रवींद्र याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असल्याची चर्चा वाकोद गावासह परिसरात सुरू आहे.