संर्पदंशाने अल्पवयीन मुलाचा मृत्यु , वाकी ता.जामनेर येथील करुण घटना .

0
104

जामनेर दि .२५ ( प्रतिनिधी ) :- रात्री झोपेमधे असतांना सर्पदंश झाल्याने सोपान नथ्थु ढाकरे (वय १६) या मुलाचा दुखःद मृत्यु झाला आहे . जामनेर शहरा जवळील वाकी गावात ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे .

                सोपान ढाकरे हा अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबीयां सोबत रात्री खाटेवर झोपलेला होता .दरम्यान रात्री १ .३० वाजेच्या सुमारास त्याच्या पायाच्या बोटाला काहीतरी चावले त्यामुळे त्याला जाग आली . यावेळी आजुबाजुला साप वैगरे नव्हता त्यामुळे काही तरी कीटक चावले असावे असे कुटुंबीयांना वाटले ,म्हणुन सर्वांनी या घटनेेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे सोपान पुन्हा झोपी गेला .परंतु आज सकाळी त्याच्या तोंडामधुन पांढरा फेस येत असल्याचे कुटुंबीयांना दिसले . त्यांनी लागलीच जामनेर गाठत मुलाला एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केलेे . यावेळी डॉक्टरांनी या अल्पवयीन मुलाची प्रकृती नाजुक असल्याचे सांगत त्याला जळगांव जिल्हा रुग्णाायलात हलविण्याचे सांगीतले . जळगांव उपजिल्हा रुग्णाालया उपचार सुरू असतांनाच या मुलाचा करुण अंत आज झाला आहेे .नथ्थु ढाकरे यांना दोन अपत्य असुन एक मोठा मुलगा शिक्षण घेत आहे तर मृत सोपान लहान होता . त्याच्या मृत्युने वाकी गावामधे हळहळ व्यक्त केल्या जात आहेे .