ग्रेट मराठी न्युज(GM NEWS ) : दुःखद अपघात वृत्त : इको आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दोघं दुचाकीस्वार ठार तर तिघ गंभीर जखमी. दुचाकीसह चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा. जामनेर तालुक्यातील फत्तेपुर – मादणी जवळील घटना.

0
68

फत्तेपूर ता. जामनेर दि.18 ( जी.एम न्युज वृत्तसेवा ) :

फत्तेपूर येथून जळगावला निघालेल्या इको गाडीचा राष्ट्रीय मार्ग.क्रं.४४ वर मादणी गावा जवळील डॉ.किशोर दत्तात्रय पाटील यांच्या शेताजवळ जामनेर येथून फत्तेपूर कडे येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने भिषण अपघात झाला यात दुचाकीस्वार सौरव कैलास कोळी रा. कोदोली ता. जामनेर हा युवक जागीच ठार झाला तर त्याच्या मागे बसलेला शुभम दिनकर जाधव रा . शिंगाईत ता.जामनेर हा गंभीर जखमी झाला होता त्याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झालाची दुःखद घटना आज घडली आहे.इको गाडीचा चालक मंगेश संतोष कोळी तसेच प्रवासी सेवानिवृत मुख्याध्यापक चंद्रकांत लक्ष्मण जैन व त्यांची पत्नी प्रमिलाबाई जैन हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

अपघात इतका भिषण होता की इको गाडी MH19EA .2779 व विना क्रमांकाची BMW या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघात स्थळी मादणी फत्तेपूर येथील ग्रामस्थांसह पोलीसांनी धाव घेतली व जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविले तर मृतास जी.एम . फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेतून चालक जालमसिंग यांनी जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले पुढील तपास पोनि सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ .किरण शिंपी प्रविण चौधरी दिनेश मारवडकर पो.कॉ. गनी तडवी अरुण पाटील राहुल जोहरे मुकेश पाटील करीत आहे.