GM NEWS, FLASH: ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा .

0
330

जळगाव, दि. 6 ( मिलींद लोखंडे) : –
जळगाव जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या मूळ ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक-2021 करिता 15 जानेवारी, 2021 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 15 जानेवारी 2021 या दिवशीचा आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

मार्केट ॲण्ड फेअर्स ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुक असलेल्या एकुण 783 ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्या गावांचा 15 जानेवारी 2021 (शुक्रवार) रोजी आठवडे बाजार असेल त्या गावाचा आठवडे बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.