रवींद्र महाजन यांना उद्यान पंडित पुरस्कार जाहीर .

0
135

जामनेर दि. 25 (मिलिंद लोखंडे)-

जामनेर येथील मातोश्री नर्सरीचे संचालक तथा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र माधवराव महाजन यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने, कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या, शेतकर्‍यांना दिला जाणारा सण 2017 चा उद्यान पंडित पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे.

दिनांक 20 सप्टेंबर 2019 रोजी निघालेल्या, शासन निर्णयानुसार राज्यातील विविध कृषी पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून, राज्यभरात उद्यानपंडित पुरस्कारासाठी नऊ शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातून रवींद्र महाजन हे एकमेव आहेत.

श्री महाजन यांनी आपल्या शेतात वनशेती, आंबा, मोसंबी या फळपिकांची घन पद्धतीने लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर, जलसंधारण पाणलोट विकास, जल व्यवस्थापन, फळबागांना पाणी देण्यासाठी सुष्म नियोजन असे विविध प्रयोग करून, मातोश्री नर्सरीच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यभरात तयार झालेल्या फळबागा, फळबागेच्या माध्यमातून साधलेली प्रगती आणि शेतकरी आत्महत्या कारणे आणि उपाय या विषयावर स्वतः नाट्यलेखन करून, आत्महत्या रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक क्षेत्रातील कार्य आदी कामांची दखल घेऊन, सदर पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे .