GM NEWS , Big Breaking : – चारूतांडा धरणाचा भराव वाहून गेला. ग्रामस्थांनी रात्रभर घेतला टेकळीवर आश्रय , जामनेर तालुक्यातील कांग नदी परीसरातील गावांना निर्माण झाला धोका .

0
146

फत्तेपूर .ता. जामनेर दि .२६(सुनिल शेजुळे ) : – जामनेर तालुक्याच्या सिमेवर मराठवाडयाच्या सोयगाव तालुक्यातील चारूतांडा गावाला लागूनच नव्यानेच बांधण्यात आलेल्या कांग नदीवरील धरणाचा भराव व सांडव्याची कॉक्रिटभिंत काल झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेली चारुतांडा गावात धरण फुटल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांनी रात्रभर गावाशेजारील उंच टेकळीवर आश्रय घेतला
पावसाचा जोर कायम असल्याने आणिबाणीची परिस्थिती उदभण्याची शक्यता आहे या धरणाच्या सांडव्यातून जामनेर तालुक्यातील कांगधरणात पाण्याचा विसर्ग होतो कांगधरण  या पूर्वीच ओव्हरफ्लो झाले आहे हेसंपूर्ण पाणी दक्षिण उत्तर वाहिनी असलेल्य कांग नदीतून वसंतनगर , गोद्री , फत्तेपूर , टाकळी, मेहेगाव निमखेडी, जळांद्री सावरला  जामनेर येथून वाघूरप्रकल्पात जाते इतकेच नव्हे तर सोयगाव तालुक्यातील रवळा धरण व जामनेर तालुक्यातील गोद्री तांडा पाझर तलाव देखील शंभर टक्के भरल्याने यातील पाण्याचा विसर्ग कांग नदीद्वारे वाघूर प्रकल्यात होत असल्याने नदीला दररोज पूर येत आहे त्यामुळे कांग नदी काठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नव्यानेच बांधण्यात आलेल्या धरणाचा भराव व सांड व्याची भिंत पहिल्याच पावसात वाहून जाते याबाबत हे काम निकृष्ट झाले आहे याची चौकशी शासनस्तरावर करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे