GM NEWS , आंदोलन वृत्त: उत्तर प्रदेशात अंगणवाडी मदतनीस महिलेवर झालेल्या अत्याचाराचा पहूर येथे अंगणवाडी सेविकांनी नोंदविला निषेध .

0
182

पहूर , ता . जामनेर दि . ११ ( शंकर भामेरे ) : – उत्तर प्रदेशातील अंगणवाडी मदतनीस महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा पहूर पेठ येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी काळ्या फीती लावून तीव्र निषेध नोंदविला .
पहूर पेठ येथे सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस सदर आंदोलन करण्यात येत असून यात सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या आहेत .भंडारा जिल्ह्यातील निरपराध चिमुकल्यांच्या दुर्देवी मृत्यूच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
यावेळी माजी पंचायत समिती सभापती राजधर पांढरे , उपसरपंच शाम सावळे, अॅड . संजय देशमुख , समाधान पाटील , शरद बेलपत्रे , विकास चेअरमन किरण खैरनार , अनिल घाटे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होते .