GM NEWS ,FLASH : जामनेर तालुक्यातील पहूर येथे उद्या स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन . पहूर पेठ गृप ग्रामपंचायतीचा माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत स्तुत्य उपक्रम . विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .

0
40

पहूर , ता जामनेर , दि . ११ ( शंकर भामेरे ) : –
राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त उद्या मंगळवार , दि १२ जानेवारी२०२१रोजी सकाळी ९ – ३० वाजता पहूर पेठ गृप ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती कवडदेवी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे . या स्पर्धेत आर .टी .लेले हायस्कूल ,सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि आर बी .आर .कन्या माध्यमिक विद्यालय या ३ शाळातील
२६ स्पर्धकांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेली आहे .

*स्पर्धेचे विषय*

१ )’होय ,आम्ही वाचविणार या वसुंधरेला ‘
२ )नदी बोलू लागली तर …
३ ) झाडे संपावर गेली तर …

*स्पर्धेचे नियम -*
स्पर्धा अगदी निशुल्क आहे .
स्पर्धा इयत्ता ९ वी ते १२ वी या गटासाठी आहे .
स्पर्धकाने वरील पैकी कोणताही एकच विषय स्पर्धेसाठी निवडावा .
प्रत्येक स्पर्धकाला आपला विषय मांडण्यासाठी ४ मिनिटांचा वेळ दिला जाईल .
३ मिनीटांनंतर सूचना बेल होईल . उर्वरीत १ मिनीटात स्पर्धकाने आपले भाषण पूर्ण करावे .
स्पर्धेचे माध्यम मराठी भाषा राहील .
स्पर्धा पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात होईल .
स्पर्धा स्थळी वेळेपूर्वी अर्धातास उपस्थित राहावे .
अनुक्रमे प्रथम ,द्वितीय ,तृतीय विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देवून गौरविण्यात येईल .
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाची प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील .
स्पर्धेचे परीक्षण परीक्षण समिती तर्फे केले जाईल .
कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करण्यात यावे . ( तोंडाला मास्क बांधावे . )
परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील .

यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच – निताताई रामेश्वर पाटील,
उपसरपंच श्याम सावळे
ग्राम विकास अधिकारी
डी . पी . टेमकर , स्पर्धा समन्वयक शंकर भामेरे यांनी केले आहे .