GM NEWS,दिन विशेष: राष्ट्रमाता मॉ साहेब जिजाऊ जन्मोत्सोवा निमित्त जामनेर तालुका फोटोग्राफर असोशियनच्या वतीने आयोजीत भव्य रक्तदान शिबीरात १२३ रक्तदात्यांनी केले रक्तदान . रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्रासह मॉ साहेब जिजाऊंची प्रतिमा भेट देऊन आयोजकांनी केला सन्मान . कार्यक्रमला सर्वधर्मीय सर्व पक्षीय मान्यवरांची उपस्थीती.

0
185

जामनेर,दि.१२ (मनोज दुसाने ) : – राष्ट्रमाता मॉ साहेब जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त जामनेर तालुका फोटोग्राफर असोशियशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन आज करण्यात आले होते . जामनेर शहरातील भुसावळ रोड वरील मिरची ग्राऊंड या ठीकाणी सकाळी . ९ वा . ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोशियनचे अध्यक्ष श्री . विनोद चौधरी यांच्या हस्ते मॉ साहेब जिजाऊ प्रतिमेचे पुजन करून रक्तदान शिबीरास प्रारंभ करण्यात आला . १२३ रक्तदात्यांनी दुपारी ३ वाजे पर्यंत स्वंयस्फुर्तीने रक्तदान करून मॉ साहेब जिजाऊंना मानवंदना दिली. कार्यक्रमस्थळी सर्वपक्षीय सर्वधर्मीय मान्यवरांनी उपस्थिती देऊन माँ साहेब जिजाऊ प्रतिमेला पुष्प वाहुन अभिवादन केले .
या प्रसंगी रक्तदान करणाऱ्या सर्व १२३ रक्तदात्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रासह माँ साहेब जिजाऊ यांची प्रतिमा सप्रेम भेट देऊन आयोजकांच्या वतीने सन्मानीत करण्यात आले . या सोबतच रक्तसंकलन करण्यासाठी आलेलेल्या जळगांव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढीला आयोजकांच्या वतीने माँ साहेब जिजाऊ यांची मोठी फोटो फ्रेम भेट देण्यात आली . रक्तदान शिबीराचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जामनेर तालुका फोटोग्राफर असोशियनचे सर्व पदाधिकारी व फोटोग्राफर बांधवांनी परीश्रम घेतले .