GM NEWS , अभिनंदनिय वृत्त : पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत आर . बी .आर . कन्या विद्यालयाची रिता फरकांडे प्रथम . रविना पांढरे द्वितीय तर स्वाती देशमुख तृतीय . विजेत्यांचा स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी केला सत्कार .

0
222

पहूर , ता जामनेर , दि . १२ ( शंकर भामेरे ) : –
राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत आर .बी . कन्या विद्यालयाच्या रिता समाधान फरकांडे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून याच शाळेच्या रविना ज्ञानेश्वर पांढरे हिने द्वितीय तर सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या स्वाती अर्जुन देशमुख हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला . अपेक्षा गजानन पाटील आणि संजीवनी शरद पांढरे या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले.विजेत्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत आणि मान्यवरांच्या वतीने स्मृतिचिन्ह , सन्मानपत्र , विचार पुस्तिका , लायटर , गुलाब पुष्प आणि रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .आर .टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, आर .बी . आर .कन्या विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाले होते .सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आली .
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले माध्यामिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले . यावेळी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .यावेळी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आपण वसुंधरेचे रक्षण केले पाहिजे असे आवाहन केले .याप्रसंगी सरपंच निताताई पाटील , उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील , वि.का.सो . चेअरमन किरण खैरनार , शरद बेलपपत्रे , विश्वनाथ वानखेडे , आदींनी मनोगत व्यक्त केले .प्रस्ताविक स्पर्धा समन्वयक शंकर भामेरे यांनी केले . स्पर्धेचे परीक्षक म्हणून महेश मोरे आणि कीर्ती घोंगडे यांनी तसेच वेळाधिकारी म्हणून विजय बोरसे यांनी काम पाहिले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाधान पाटील यांनी भूषविले .यावेळी विस्तार अधिकारी श्री बैरागी , माजी पंचायत समिती सभापती राजधर पांढरे , उपसरपंच श्याम सावळे , अॅड . एस .आर .पाटील , अशोक पाटील , मुख्याध्यापक सुधीर महाजन , पर्यवेक्षक आर . बी . पाटील पाटील , आर . टी . देशमुख , ईश्वर पाटील , रवींद्र मोरे , डॉ .संभाजी क्षीरसागर , रवींद्र घोलप , गणेश पांढरे , मनोज जोशी ,संतोष पाटील , शांताराम गोंधनखेडे , शिवाजी कलाल , विजय मोरे , चेतन रोकडे यांच्यासह विद्यार्थी शिक्षक , पत्रकार बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शंकर भामेरे यांनी सुत्रसंचालन केले तर आभार रामेश्वर पाटील यांनी मानले .यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी शरद नरवाडे , नईम शेख ,जीवन पाटील ,शकील तडवी ,विशाल पाटील यांच्यासह विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहकार्य केले .